वानखेडेबाबत ठाकरे यांनी कान उपटताच संजय राऊत यांची सारवासारव...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे आत्मविश्वासाने तसेच ठासून सांगणारे आणि महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका पार पाडणारे संजय राऊत यांना एका प्रश्नाला ठाकरे कुटूंबाकडून `ऑनलाईन उत्तर` देण्यात आले आहे. पण ठाकरेंच्या कानउघाडणीनंतर राऊत यांनी लगेचच सारवसारव केली.

मुंबई: मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार  असे आत्मविश्वासाने तसेच ठासून सांगणारे आणि महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका पार पाडणारे संजय राऊत यांना एका प्रश्नाला  ठाकरे कुटूंबाकडून `ऑनलाईन उत्तर` देण्यात आले आहे. पण ठाकरेंच्या कानउघाडणीनंतर राऊत यांनी लगेचच सारवसारव केली.

प्रामुख्याने मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी सर्व पातळीवर रात्रं दिवस प्रयत्न केले जात आहेत. कॉरंटाईन हा त्यातला महत्वाचा भाग ठरत आहे. मुंबईत कोरोना संशयीतांची संख्या वाढू शकते अशी भीती केंद्र सरकारच्या पहाणी पथकानेही केली होती त्यामुळे ठाकरे सरकार त्या दृष्टीने तयारी करू लागले होते. रुग्णालये कमी पडू नये म्हणून कॉरंटाईनसाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यात आले त्यातूनच बीसीके येथील मैदानात एक हजार खांटांची व्यवस्था उभी रहात आहे.

हेही वाचा: बायको-मुलांसमोर दारू कशी पिऊ? घरपोच दारूचा पर्याय मोकळा मात्र मद्यप्रेमींची घालमेल 

येत्या काळात बीकेसी येथील व्यवस्था कमी पडू नये म्हणून मुंबई महापालिकेने ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमची मागणी केली. मुंबई क्रिकेट संघटनेने तयारीही दर्शवली. पण पावसाळा तोंडावर असताना स्टेडियमधील मैदानात तंबू उभारणे कठीण आहे. म्हणून स्टेडियमममघ्ये असलेल्या इतर सुविधांचा पर्याय वापण्यात येणार आहे.
हाच मुद्दा पकडून संजय राऊत यांनी वानखेडेच्या शेजारीच असलेले धनाढ्यांचे खाजगी ब्रेबॉन स्टेडियमही कॉरंटाईनसाठी वापरावे असे ट्विट केले आणि मुख्यमंत्री कार्लालय, शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांना टॅग केले. वास्तविक अशी सुचना ते `ऑफलाईन`ही करू शकले असते. 

नव्या पिढीचे नेते आदित्य ठाकरे यांनी या ट्विटची दखल घेतली खेळाची मैदाने मातीची असल्याने आणि पावसाळा तोंडावर असल्याने आपण मैदाने आणि स्टेडियम यांचा वापर कॉरंटाईनसाठी वापरू शकत नाही. खुल्या जागा ज्यांचा पाया ठोस आणि सिमेंटचा असेल अशा ठिकाणांचा वापर आपण करतच आहोत. असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले.

हेही वाचा: बाप रे ! कोरोना रुग्णाच्या हातात थोपवलं तब्बल 'इतक्या' लाखांचे बिल..रक्कम बघून तुम्हालाही बसेल धक्का 

आदित्य यांच्या उत्तरानंतर राऊत सावध झाले. वानखेडे आणि ब्रेबॉर्न सारख्या मैदानावर कोरोना रुग्णांसाठी इस्पितळे उभारली जाणार नाही. ही आदित्य ठाकरे यांची भूमिका योग्यच आहे, असे ट्विट राऊत यांनी करून सारवासारव केली एकूणच राऊत-ठाकरे-राऊत असे ट्विट आजच्या दिवसभरात रंगले. 

 

काय आहे ब्रेबॉर्न स्टेडियम

ब्रेबॉर्न स्टेडियम हे ब्रिटिश काळापासूनचे आहे. त्यांच्याशी वाद झाल्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेने 1972 मध्ये शेषराव वानखेडे यांच्या पुढाकाराने स्वतःचे वानखेडे स्टेडियमवर तयार केले. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये काही नियम काटेकोटपणे वापरले जातात. 16 वर्षांखालील मुले ड्रेसिंग रुमध्ये जाऊ शकत नाही असाही एक नियम आहे, पण सचिन तेंडुलकर जेव्हा 16 वर्षांचा होता आणि त्याला सामना खेळायचा होता तेव्हा तत्कालिन अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांनी या नियमात अपवाद केला होता असे हे ब्रेबॉर्न स्टेडियम कॉरंटाईनसाठी मिळणे कठिणच आहे.

sanjay raut immediatly gave explanation on aditya thackerays tweet read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut immediatly gave explanation on aditya thackerays tweet read full story