esakal | शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा बैठका, यावेळेस कारण आहे...
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा बैठका,  यावेळेस कारण आहे...

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा बैठका, यावेळेस कारण आहे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेतील काही खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एकूण ७ नवीन खासदार महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणार आहेत. यात भाजपकडून २ तर महाविकास आघाडीकडून ४ उमेदवार आहेत. शिल्लक राहिलेल्या मतांमधून अजून एक उमेदवार निवडून आणण्याचा प्रत्यन या दोन्ही पक्षांचा असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. 

महाविकास आघाडीकडे एकूण ४ जागा आहेत यात २ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर २ जागा शिवसेनेच्या आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचा प्रयत्न सातवी जागा मिळवण्याचा असणार आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यात संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली आहेत. 

...जमिनीवरच सतरंजी पसरून आमदार झाले गुडूप... कार्यकर्ते झाले चकित 

काय म्हणाले संजय राऊत: 

“महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा लढणार आहे. राज्यसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची जास्त मतं आहेत. काँग्रेसचीही मतं आहेत. त्यामुळे सातवी जागा आम्ही जिंकू शकतो आणि त्या जागेसंदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली होती. ती जागा यावेळेला राष्ट्रवादीकडे आहे. त्या जागेवर फौजिया खान यांची उमेदवारी पवार साहेबांनी जाहीर केली आहे. तसंच पवार साहेबांची आणि माझी भेट नेहमीच होत असते. यात वेगळं काही नाही पवार साहेबांना आणि सुप्रियाताईंना मी नेहमी भेटत असतो", असं संजय राऊत म्हणालेत. 

मनसेच्या शॅडो कॅबिनेटला शुभेच्छा:
 
"मनसे हा एक राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षानं काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मी एखाद्याबाबत सल्ला देणं बरोबर नाही. त्यांच्या पक्षात त्यांच्या विचारानुसार चालत असतं. त्यांना १४ वर्ष झाली. आपले संस्कार आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना शुभेच्छा, देतो", असं संजय राऊत यांनी म्हंटलंय. 

बापरे !...म्हणून त्याने मित्राला चौथ्या मजल्यावरून दिलं फेकून.... 

अयोध्या दौऱ्यावर टीका करू नका: 

"अयोध्या दौऱ्यावर टीका करण्याचं काहीही कारण नाही. माननीय उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अयोध्येला गेले होते का? विरोधी पक्षनेत्यांनी आत्ममंथन करावं. स्वतःला ट्रेन करणं गरजेचं आहे. कोणताही विचार न करता टीका केल्यामुळे विरोधी पक्षाची प्रतिष्ठा कमी होते. या राज्यात आणि देशात विरोधी पक्ष सक्रिय असला पाहिजे, टिकला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. मात्र प्रत्येक वेळी टीका करणं योग्य नाही." असंही संजय राऊत यांनी म्हंटलंय.

Sanjay raut met sharad pawar to discuss on  rajyasabha seats read full story