
...तर लडाखमध्ये घुसलेलं चीनचं सैन्य पळून जाईल, राऊतांचा भाजपला टोला
मुंबई : महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईच्या बीकेसी मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं. या सभेत उध्दव ठाकरे या सभेत काय बोलतील याकडे सगळ्याचे लक्ष लागलेले असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सभेत बोलताना चौफेर फटकेबाजी केली.
राज्यात हनुमान चालिसावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य करत संजय राऊत म्हणाले की, आपल्या तोफा नेहमीच धडाडत असतात, उध्दव ठाकरे खूप मोठा दारूगोळा घेऊन व्यासपीठावर येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
सभेला जमलेल्या गर्दीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, वांद्र्यात सुरू झालीली सभेचं दुसरं टोक कुर्ल्यात आहे, असे सांगून ते म्हणाले की, आजची सभा सांगतेय मुंबईचा बाप फक्त शिवसेना, कोणाला पाहायचं असेल तर येऊन पाहा. या सभेचा संदेश आहे की शिवसेना आणि महाराष्ट्र कोणापुढे झुकणार नाही, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा: "सोनिया गांधींचा गैरसमज झाला तर…"; राणांवरील टिकेला भाजपचं उत्तर
पुढे बोलताना हनुमान चालिसा पठनाचा मुद्दा घेत म्हणाले की, इथल्या सगळ्या लोकांनी हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली, तर लडाखमध्ये घुसलेलं चीनचं सैन्य पळून गेल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या हिंदू महासागरात आहे असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा: शिवसेना म्हणजे काय? गुलाबराव पाटलांनी व्यासपीठावरून सांगितला अर्थ
Web Title: Sanjay Raut Statment On Hanuman Chalisa In Uddhhav Thackeray Shivsena Rally In Bkc Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..