esakal | "बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही​" : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

"बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही​" : संजय राऊत

संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनातून पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर सडेतोड हल्लाबोल केला आहे.

"बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही​" : संजय राऊत

sakal_logo
By
संजय राऊत

मुंबई : संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनातून पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर सडेतोड हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील  सरकार पडण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला राज्यातील सरकारमध्ये अडकू नका, असं भारतीय जनता पक्षाकडून सांगितलं जातंय, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून केला.   

महत्त्वाची बातमी : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 35 महत्त्वाचे मुद्दे; भाजपाला म्हणतात "जो उखाडना है उखाडो"

कालपासून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून समन्स आल्याचं बोललं जात होतं. यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व घटनांची माहिती माध्यमांना याबाबत माहिती दिली. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांची देहबोली अत्यंत आक्रमक असल्याचं पाहायला मिळाली.

"गेल्या दीड महिन्यांपासून आपला ED सोबत पत्रव्यवहार सुरु आहे असं राऊत म्हणालेत, पुढे बोलताना राऊत म्हणालेत की, "तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला घरी येवून अटक करा. नोटिशीला उत्तर दिलं जाईल. मात्र बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही", असा घणाघात संजय राऊतांनी केलाय.

महत्त्वाची बातमी : वर्षा राऊत यांना ED नोटीस; आदित्य ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

वर्षा राऊत यांच्या नावे १२ वर्षांपूर्वीचा एक व्यवहार आहे. घर घेण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिक्षिकेने मैत्रिणीकडून 50 लाखाचं कर्ज घेतलं होतं. त्याबाबतबा ED ला आज जाग येते, असा सवालही संजय राऊत यांनी विचारलाय.

sanjay raut targets BJP and ED in his press conference after third notice to varsha raut

loading image