Sanjay Raut | 'बाळासाहेबांना भोंग्यांची...' पुण्यातील सभेआधीच राऊतांचा मनसेवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

'बाळासाहेबांना भोंग्यांची...' पुण्यातील सभेआधीच राऊतांचा मनसेवर निशाणा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पुण्यात सभा घेणार आहेत. यावेळी मनसे सोडलेल्या काही नेत्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना जागतिक व्यंगचित्र दिवसाच्या टोमणा मारत शुभेच्छा दिल्या आहेत. (Sanjay raut on Raj Thackeray)

ज्यांच्यामध्ये बाळासाहेबांसारखी व्यंगचित्रकलेची क्षमता होती, असं आम्हाला वाटायचं, त्यांनी ते सोडून भोंग्यांचं राजकारण सुरू केलं, असा टोला राऊत यांनी लगावला. (Sanjay Raut News)

हेही वाचा: भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला : संजय राऊत

बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढून महाराष्ट्रासह देशातही सत्ता परिवर्तन केलं. बाळासाहेबांसारखा व्यंगचित्रकार निर्माण व्हावा, यासाठी आमची प्रार्थना आहे. पण त्यांच्यासारखी क्षमता असणाऱ्यांनी भोंग्यांच्या राजकारणात रस दाखवल्याचं त्यांनी म्हटलंय.

भोंग्यांच्या प्रकरणात लाखो हिंदूंनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. शिर्डी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काकडा आरत्या बंद करण्याची वेळ आली आहे. मशीदींवरच्या भोंग्यांच्या राजकारणामुळे हिंदूंचा संताप होत आहे. मनसेमुळे भोंग्यांंचं राजकारण हिंदूंवर बुमरँग होत असल्याला त्यांनी अनुमोदन दिलंय.

Web Title: Sanjay Raut Taunts Raj Thackeray Over Loud Speaker Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanjay Raut
go to top