
"संजय राऊतांनीच घेतली शिवसेना संपवण्याची सुपारी"
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभुराज देसाई यांनी नाव न घेता केला आहे. शिवसेनेचे आमदार वारंवार याबाबत उद्धव ठाकरेंना सांगत होते पण त्यांनी ऐकलं नाही, असं ही त्यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut took efforts to end Shiv Sena says Shambhuraj Desai)
हेही वाचा: उद्धव ठाकरेंनी प्रति'मातोश्री' तयार केली, त्यामुळं...; भरत गोगावले स्पष्टच बोलले
शंभुराज देसाई म्हणाले, आमचे अनेक नेते सांगतात की, कोणीतरी उद्धव ठाकरेंच्या जवळ असणाऱ्या मोठ्या व्यक्तीनं शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्याचे परिणाम गेल्या अडीच वर्षात दिसून आले आहेत. शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार एका बाजूला गेले आहेत. हा ट्रेन्ड हळूहळू खालीपर्यंत जाणार आहे.
हेही वाचा: भगवंत मान केजरीवालांच्याही पुढं; पंजाबमध्ये 300 नव्हे, 600 युनिट वीज मोफत
पण या आमदारांचं का बरं ऐकलं गेलं नाही? कुणाच्या सल्ल्यामुळं ऐकलं गेलं नाही? कोणाच्या सांगण्यामुळं ऐकलं गेलं नाही? नेत्यांनी आता हा विचार केला पाहिजे की, हे ४० लोक आपल्याला जे सांगत होते त्यात आता तथ्य आढळून आलं आहे, असंही शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
Web Title: Sanjay Raut Took Efforts To End Shiv Sena Says Shambhuraj Desai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..