शिवसैनिक अॅक्शन मोडमध्ये, थेट ईडीच्या कार्यालयाबाहेर लावले बॅनर

शिवसैनिक अॅक्शन मोडमध्ये, थेट ईडीच्या कार्यालयाबाहेर लावले बॅनर

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस  पाठवली.  आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आली आहे. त्यात शिवसैनिकही भलतेच अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत.  कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले.  या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.

वारंवार ईडीकडून नोटीस येत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी ईडी ऑफिसबाहेर भाजप प्रदेश कार्यालय म्हणून बॅनर लावल्याचं बोललं जातंय. तसंच राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस पाठवल्याने हा राजकीय षडयंत्र असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

'ईडीच्या आडून कुटुंबांवर हल्ले करणं ही नामर्दानगी आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन लढा,' असं थेट आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलंय. तुम्ही कुणाशी पंगा घेतलाय हे लवकरच कळेल, तुमची नशा उतरवून टाकेन, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावलाय. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावलीय. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वर्षा राऊत यांनी दहा वर्षांपुर्वी 50 लाखांचं कर्ज घेतलं असून त्याची पूर्ण माहिती आपण आयकर विभागाला दिलेली आहे. असं असतानाही ईडीच्या नोटीशीचा संबंध काय असा सवालही त्यांनी केलाय. शिवाय 'भाजप नेत्यांची संपत्ती 1600 पटींनी वाढली' त्या नेत्यांची चौकशी करणार का? असा सवालही त्यांनी केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com