संजय राऊत ऊद्या बेळगावला, पाहू काय घडतंय..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद पेटण्याचे संकेत 

मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न वरून दोन्ही राज्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत असून शिवसेना नेते संजय राऊत उद्या बेळगावला जाणार असल्याने हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संजय राऊत स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र कर्नाटक सरकारने संजय राऊत यांना बेळगाव बंदी केल्याने शिवसेना विरुद्ध ख चे भाजप सरकार असा संघर्ष पुन्हा भेटण्याचे संकेत आहेत.

मोठी बातमी - मनसे मेळाव्याची निमंत्रणपत्रिका पहिली का ? निमंत्रणपत्रिकेतून कसले संकेत ?

आजच राज्यमंत्री राजेंद्र याड्रावकर हे बेळगावला गेले असता त्यांना तिथे अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या खासदार संजय राऊत जात असल्याने या नव्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याचे सांगितले जात आहे. कर्नाटक सरकारने बंदी केलेली असली तरी बेळगावला जाणारच असा निर्धार राऊत यांनी आज व्यक्त केला. त्यामुळे राऊत कोणत्या मार्गाने आणि कशा स्वरूपात बेळगावला रवाना होत आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

मोठी बातमी - मुख्यमंत्री कार्यालयात होणार कर्मचारी कपात, कारण तर जाणून घ्या..

मोठी बातमी - हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटमधून या टीव्ही अभिनेत्रींची सुटका! 

महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीलाच कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्न संदर्भात ठोस भूमिका घेण्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती देखील नेमण्यात आली. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे या सीमा लढ्यातील दोन्ही नेत्यांकडे या समितीचे जबाबदारी देण्यात आली आहे या घडामोडींमुळे कर्नाटकचे भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील शिवसेनेचे सरकार असा सीमा वादावरून नव्याने संघर्ष पेटण्याचे संकेत दिले जात आहेत. 

sanjay raut to visit belgaon to attain event organised by maharashtra ekikaran samiti


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut to visit belgaon to attain event organised by maharashtra ekikaran samiti