संजय राऊत यांचं 'चक्रावून' टाकणारं ट्विट, राऊत म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेत आणि महाराष्ट्राने राजकारणातील भूकंप काय असतात याचा अनुभव घेतला. महाराष्ट्र महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात दोन व्यक्तींचा महत्त्वाचा हात आहे ते म्हणजे शरद पवार आणि संजय राऊत.

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेत आणि महाराष्ट्राने राजकारणातील भूकंप काय असतात याचा अनुभव घेतला. महाराष्ट्र महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात दोन व्यक्तींचा महत्त्वाचा हात आहे ते म्हणजे शरद पवार आणि संजय राऊत.

यातील संजय राऊतांबद्दल बोलायचं झालं तर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू इतक्या मजबुतीने सांभाळलेली की त्यानं शिवसेनेच्या तत्कालीन मित्रपक्षांना नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. सत्ता संघर्षाच्या काळात दररोज नित्याने माध्यमांशी संवाद साधायचा, ट्विटरवरून आपल्याला न पटणारे मुद्दे, शेरो शायरी किंवा शिवसेना स्टाईलमध्ये मांडायचे हे नित्याचं होतं.

मोठी बातमी -  साथीच्या आजारांचा नशेबाज 'असा' उचलतायत फायदा...

अशात सत्तास्थापन झाल्यानंतर 'मी आता सामानातून बोलेन' असं स्वतः संजय राऊतांनी सांगितलं होतं. या नंतर देखील अनेक विषयांवर राऊतांनी ट्विटरवरून अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे. यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आघाडीचं सरकार १०० दिवस पूर्ण करताच उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार ही माहिती देखील होतीच.

दरम्यान आज संजय राऊतांनी एक नवीन ट्विट केलंय, यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या मनात 'आता काय' असा प्रश्न निर्माण झालाय. 

मोठी बातमी - १०० युनिट मोफत विजेचा महाविकास आघाडीलाच बसणार शॉक?

कुछ रिश्ते दरवाज़े खोल
जाते है
या तो दिल के, या तो
आँखों के.......

कोरोनाची दहशत ! नवी मुंबईत चिनी नागरिकांची शोधमोहीम...

महाराष्ट्रात 'महाराष्ट्र विकास आघाडी'चं सरकार स्थापन झालंय. अशात तीनही पक्षांकडून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत हे वारंवार सांगितलं देखील जातंय. मात्र असे अनेक मुद्दे आहेत जे एकमेकांच्या विचारधारेला छेद देणारे आहेत. यापैकी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे सावरकरांबद्दलची शिवसेनेची भूमिका, शिवसेनेचं हिंदुत्व, CAA, NRC या सारख्या बाबी किंवा अगदी मुस्लिम आरक्षण या बाबी प्रामुख्याने येऊ शकतात. 

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, "कुछ रिश्ते दरवाज़े खोल जाते है. या तो दिल के, या तो आँखों के......." आता राऊतांच्या या ट्विटमुळे महाविकास आघाडीकडून राऊतांच्या हृदयाचे दरवाजे उघडले की डोळे उघडले हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे. 

sanjay rauts new tweet confuses political experts 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay rauts new tweet confuses political experts