संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

मुंबई - गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गानसरस्वती पुरस्कार यंदा मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे.

मुंबई - गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गानसरस्वती पुरस्कार यंदा मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे.

आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे आद्य शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार मागील वर्षापासून सुरू केला आहे. मुंबईतील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे 6 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

भारतीय शास्त्रीय कंठसंगीत क्षेत्रात यश मिळवलेल्या 50 वर्षांहून कमी वयाच्या कलाकारास हा पुरस्कार दिला जातो. 1 लाख रुपये आणि मानपत्र, असे त्याचे स्वरूप आहे. 2017 मध्ये पहिला गानसरस्वती पुरस्कार प्रख्यात गायिका मंजिरी असनारे यांना प्रदान करण्यात आला होता.

पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद मला झाला आहे. या पुरस्कारच्या रूपाने किशोरीताईंचा आशीर्वाद मला मिळाल्याचे मी समजतो.
- संजीव अभ्यंकर, गायक, संगीतकार

Web Title: Sanjeev Abhyankar Gansaraswati Award