सांताक्रूझ स्थानकावरील पूल 1 जानेवारीपासून खुला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई - सांताक्रूझ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. हा पूल खुला करण्याच्या मागणीसाठी मनविसेने आंदोलनाचा इशाराही दिला होता. हा पादचारी पूल एक जानेवारीपासून खुला करण्यात येईल, असे पश्‍चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

महापालिकेने सांताक्रूझ स्थानकावरील 90.3 मीटर लांब आणि सहा मीटर रुंद पादचारी पूल 1971 मध्ये बांधला होता. या पादचारी पुलाची पडझड झाल्याचे ऑगस्टमध्ये झालेल्या संयुक्त निरीक्षणात आढळले होते. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुरुस्तीच्या कामासाठी 11 सप्टेंबरपासून पूल बंद करण्यात आला; परंतु दुरुस्तीचे काम वेळेत सुरू न झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पश्‍चिम रेल्वेला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता.

Web Title: santacruz railway station Pedestrian Bridge open