केळवे येथे अनैतिक व्यवसाय करणारयांवर कारवाई; दोघांना अटक

प्रमोद पाटील
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

सफाळे - नोकरीचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असलेल्या वसईतील एका महिला दलालासह केळवे येथील हाॅटेल मालकाला केळवे येथे सोमवारी  (30) अटक करण्यात आली असून पिडीत मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. 

सफाळे - नोकरीचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असलेल्या वसईतील एका महिला दलालासह केळवे येथील हाॅटेल मालकाला केळवे येथे सोमवारी  (30) अटक करण्यात आली असून पिडीत मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. 

पालघर जिल्ह्यातील दातीवरे, खारडी पासून केळवे पर्यंत सुमारे 43 हाॅटेल, रिसाॅट असोसिएशनशी संबंधित तसेच इतरही असंख्य छोटी- छोटी रिसाॅट आहेत. सागरी किनारी असलेल्या या हाॅटेल, रिसाॅट मध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई व मुंबई उपनगरातील पर्यटक येत असतात. याचा गैरफायदा घेऊन काही दलाल या भागात अनैतिक व्यवसाय करत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती.मात्र या बाबतीत कोणीही पुढे येत नव्हते. तर अशा व्यवसायामुळे  स्थानिकांना त्रास होत आहे अशी दबक्या आवाजात चर्चा होती.

याच अनुषंगाने पोलिसांना शुक्रवारी  (27) संध्याकाळी एक दलाल महिला एका मुलीला घेऊन केळवे येथील निर्मल रिसाॅट मध्ये घेऊन आल्याची खबर मिळाली. त्यानुसार केळवे सागरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षिका सिद्धबा जायभाये यांनी पालघर जिल्हा सहाय्यक पोलिस अधिकारी तथा उप विभागिय पोलीस अधिकारी निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पोलिसांच्या  ताफ्यासह निर्मल रिसाॅटवर धाड टाकली असता पश्चिमबंगाल येथील एका  26 वर्षीय मुलीला नोकरीला लावण्याचे सांगून एका ग्राहकाला एका तासासाठी एक हजार रुपये दराने अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दलाल दबाव आणत होता. मात्र सदर महिलेने अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देताच दलाल महिला व पिडितमहिला या दोघींचं कडाक्याचे भांडण सुरू झाले. या दरम्यान ग्राहक पळून गेला तर दोघींनाही  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दलाल महिलेेवर अनैतिक व्यापार अधिनियम 3, 4, 5, 6, 7 तसेच कलम 370, 341, 323, 504 व 506 गुन्हे दाखल करण्यात आले असून 31 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.तसेच रिसाॅट मालक रविंद्र काशीनाथ राऊत यांच्यावर अनैतिक कामासाठी रिसाॅट वापरल्यामुळे पिटा कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. तर पिडित मुलीला बालसुधारगृृृहात पाठविण्यात आले आहे. 

केळवे पोलिसच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धबा जायभाये यांनी या पूर्वी पूणे येथील बुधवार पेठेत दोन वर्षात 50 अनैतिक केसेस हाती घेऊन 150 पेक्षा जास्त मुलींची अनैतिक व्यवसायातून  सुटका करून बाल सुधारगृहात पाठविले आहे. केळवे परिसरातील त्यांच्या या कारवाईचे  सर्वत्र कौतुक केलं जात आहे. या कारवाईमुळे असे व्यवसाय करणारयांचे धाबे दणाणले आहेत. 

मोठ्या रॅकेटची शक्यता
पश्चिम बंगाल आणि बिहार भागातून नोकरीला लावण्याच्या निमित्ताने मुलींना मुंबईत आणले जाते. इथे आल्यानंतर पती आणि पत्नी सारखे राहून दलालाकडून अनैतिक व्यवसायात त्यांचा बळी दिला जात आहे. या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

Web Title: saphale palghar news crime on Immoral business