सेल्फीच्या नादात जीव गमावला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

माथेरान - सेल्फी काढण्याच्या नादात वाऱ्याचा झोत आल्याने दरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माथेरान येथे घडली. सरिता चौहान असे मृत महिलेचे नाव आहे.

माथेरान - सेल्फी काढण्याच्या नादात वाऱ्याचा झोत आल्याने दरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माथेरान येथे घडली. सरिता चौहान असे मृत महिलेचे नाव आहे.

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी दिल्ली येथून सरिता चौहान या आपल्या पती आणि तीन मुलांसह पुण्यात आल्या होत्या. पुण्यातून महाबळेश्‍वर, माथेरान आणि नंतर मुंबई फिरण्याचा त्यांचा बेत होता. त्या मंगळवारी (ता.19) माथेरान येथे आल्या होत्या. लुईस पॉइंटवर संरक्षक कठडा ओलांडून सेल्फी घेण्यासाठी पतीसोबत त्या गेल्या; मात्र त्याचवेळी जोराचा वारा सुटला. त्यामुळे सरिता यांचा तोल जात त्या 1300 फूट खोल दरीत पडल्या. माथेरानमधील सह्याद्री रेस्क्‍यू टीमने तातडीने पोलिसांसह शोधमोहीम सुरू केली. रात्री 11 वाजता चौहान यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले.

Web Title: sarita chauhan death by selfie