पालीचे सरपंच गणेश बाळके शेकापमध्ये

पाली : सरपंच गणेश बाळके यांचे पक्षात स्वागत करताना आमदार धैर्यशील पाटील, सुरेश खैरे व इतर मान्यवर.
पाली : सरपंच गणेश बाळके यांचे पक्षात स्वागत करताना आमदार धैर्यशील पाटील, सुरेश खैरे व इतर मान्यवर.

पाली : सुधागड तालुक्‍यातील सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बाळके यांनी शेकापमध्ये प्रवेश केला आहे. ते अपक्ष होते. 

पाली ग्रामपंचायतीवर अपक्षांची सत्ता आहे; मात्र आता गणेश बाळके यांनी त्यांची सात सोडून शेकापमध्ये प्रवेश केला आहे. शेकाप आमदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी त्यांचे स्वागत केले. 
पक्षप्रवेश कार्यक्रमात धैर्यशील पाटील यांनी सांगितले, की राज्य सरकार, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, पंचायत समिती व आमदार निधीच्या माध्यमातून पालीच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे पालीच्या खोळंबलेल्या विकासाला अधिकाधिक चालना मिळणार आहे. 

कार्यक्रमाला माजी सरपंच विजय काटकर, मिलिंद बहाडकर, पराग मेहता, हेमंत सिलीमकर, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार, ज्ञानेश्‍वर फोंडे, मधु भोईर, अभिजित देशमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पाली गावाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. 
- गणेश बाळके, सरपंच, पाली 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com