लोकशाही वाचविण्यासाठी पत्रकारांनी लेखणी धारदार करावी - डॉ.सुधीर गव्हाणे

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 23 जून 2018

मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळण्यात पत्रकारांचा फार मोठा सहभाग होता. आजच्या पत्रकारीतेत भाटांचे प्रमाण वाढले आहे आणि हेच लोकशाहीस घातक ठरत आहे.पूर्वी सारखी निर्भेळे  पत्रकारिता आता अभावानेच पहायला मिळते.पूर्वी पत्रकारांना फ़क्त चांगली बातमी छापली जावी म्हणून फोन येत असत. आता तर माझी चांगली बातमी छापली पाहिजेच त्याच बरोबर माझ्या विरोधकाची वाईट बातमी आली पाहिजे असे दबावाचे फोन पत्रकारांना येत असतात.

मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळण्यात पत्रकारांचा फार मोठा सहभाग होता. आजच्या पत्रकारीतेत भाटांचे प्रमाण वाढले आहे आणि हेच लोकशाहीस घातक ठरत आहे.पूर्वी सारखी निर्भेळे  पत्रकारिता आता अभावानेच पहायला मिळते.पूर्वी पत्रकारांना फ़क्त चांगली बातमी छापली जावी म्हणून फोन येत असत. आता तर माझी चांगली बातमी छापली पाहिजेच त्याच बरोबर माझ्या विरोधकाची वाईट बातमी आली पाहिजे असे दबावाचे फोन पत्रकारांना येत असतात.

इथेच पत्रकारितेच्या मूल्यांना ईजा होण्यास सुरुवात झाली.असे परखड़ मत माध्यम सल्लागार डॉ.सुधीर गव्हाणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 77 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजीत समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

निर्भिडपणे पत्रकारिता करायची तर पोषक वातावरण असावे लागते.हे देशात लोकशाही असल्याचे शुभ संकेत मानले जाते.वंचिताना न्याय मिळणे हा लोकशाहीचा प्राण आहे,आत्मा आहे.हिच लोकशाहिची खरी व्याख्या आहे.
या देशात सत्य काय आहे हे सांगणारी पत्रकारिता जगली पाहिजे,जिवंत राहिली पाहिजे.तरच लोकशाही जगेल आणि देश वाचेल.
पत्रकारांनी लोकशाही टिकविण्यासाठी आणि  वाचविण्यासाठी लेखनी धारदार केली पाहिजे.

लोकशाही जर देशात राहिली नाही तर सर्व समान्यांचा आवाज असलेली पत्रकारिता शिल्लक कशी राहणार ? असा प्रश्न गव्हाणे यांनी उपस्थित केला.
एका मोठ्या दैनिकात मला संपादक पदावर  नियुक्ती साठी संधी चालून आली होती. त्या वेळी माझी मनःस्थिती दोलायमान झाली होती. माझे गुरु स्थानी असलेले डॉ.वाघमारे यांचे मार्गदर्शन घेतले तेव्हा ते म्हणाले ज्यात मनाला आनंद वाटेल,चिरकाल टिकेल असाच पर्याय निवडा. तेव्हा विचार केला की, जर संपादक झालो तर 20 - 25 वर्षे पत्रकार म्हणून नोकरी करीत पत्रकारितेचा आनंदही मिळवता येईल. पण तो चिरकालीन नसेल.

निवृत्तीच्या काळात मनाला स्वस्थता लाभायची नाही.मग येथेच(MIT-विश्वशांति विद्यापीठ) राहून विद्यार्थ्यांवर पत्रकारितेचे संस्कार घडविले तर अनेक पत्रकार निर्माण होतील.तो आनंद मला अधिक स्वस्थता देणारा ठरेल आणि म्हणून मी हा पर्याय निवडून पत्रकार घडविण्याचे ठरविले.गोर गरीब कुटुंबातुन,समाजातून आलेले आपल्या संस्थेत पत्रकारितेचे धड़े घेऊन बाहेर पडत आहेत.याचा मला आनंद होतो.मनाला स्वस्थता लाभते.पत्रकारितेची भुकही भागते. मुंबई मराठी पत्रकार संघाने दरवर्षी निर्भिड व तरुण पत्रकारा साठी पुरस्कार ठेवावा अशी मागणीही डॉ.गव्हाणे यांनी केले.त्याच बरोबर गरजू जेष्ठ पत्रकारांसाठी सुरु करण्यात आलेल्या पत्रकार पेंशन योजनेचेही स्वागत केले. तत्पूर्वी डॉ.सुधीर गव्हाणे यांचे हस्ते दैनिक सामनाचे वृत्त संपादक दिवाकर शेजवळकर, फ़ोटोग्राफर प्रकाश पार्सेकर, मनोहर शिरोडकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,विश्वस्त प्रकाश कुलकर्णी, कार्यवाह संदीप चव्हाण,उपाध्यक्ष सुधाकर काश्यप, सुरेश वड़वलकर, स्वाती घोसाळकर, लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे उपस्थित होते.खांडगे यांनी डॉ.गव्हाणे यांचा परिचय करुन दिला तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती घोसाळकर यांनी केले. कार्यक्रमास सुरेश जाधव, सुमेध जाधव, रवी भिलाने, सुभाष आचरेकर उपस्थित होते.

Web Title: to save democracy journalist have to write strong said sudhir gavhane