पैशांसाठी वाट्टेल ते... 

tax-consultant
tax-consultant

कल्याण - नोटा बंदीनंतर जशी सामान्यांनी बॅंकेत गर्दी केली तशी अनेक बड्या धेंडांनी पैसा वाचवण्यासाठी कर सल्लागारांकडे धाव घेतली आहे. जवळ बाळगलेली जादाची रक्कम कोणत्याही कात्रीत न अडकता कशी वटवता येईल, याचे राजमार्ग कोणते, याच्या माहितीची देवाणघेवाण जोरात सुरू आहे. अनेक बड्या धेंडांनी पैशांच्या चिंतेपोटी कर सल्लागारांना भंडावून सोडले आहे. कर सल्लागारही मोदींच्या स्ट्राईकनंतर ग्राहकांच्या पैशांच्या काळजीत गुंतले आहेत. 

बांधकाम व्यावसायिक, किराणा तसेच सोने व्यापारी यांच्याकडे सध्या सरकारी डोळे लागले आहेत. याशिवाय मोठ्या रुग्णालयावरही लक्ष असणार हे निश्‍चित. काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांकडून क्‍लृप्त्या लढवल्या जात आहेत. काही जणांनी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांतील व्यवहारांच्या आधारावर जादाच्या रकमेतील काही रकमेची तरतूद करण्याची खटपट सुरू केली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या मुख्य फर्मला साह्य करणाऱ्या अनेक छोट्या-छोट्या फर्म असतात. ज्या त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असतात. आतापर्यंत या अशाच फर्मच्या साह्याने व्यवहारांची "ऍडजेस्टमेंट' केली जायची. त्या माध्यमातून हा जादाचा पैसा मुख्य प्रवाहात आणला जाण्याची शक्‍यता आहे. 

किराणा तसेच सोने व्यापारी यांच्याकडेही मोठी रक्कम असण्याची शक्‍यता आहे. सोने खरेदी करणाऱ्यांच्या पावतीवर पॅन नंबर बंधनकारक करण्यात आला असला तरी पहिल्या दोन दिवसांत चढ्या भावाने झालेल्या खरेदीबाबत बराच संभ्रम आहे. किराणा व्यापारी दुकानातील नुकसानीत वाढ दाखवण्याच्या प्रयत्नांत आहेत. काही वेळा त्यांची खरेदी तसेच विक्री यांचा लेखाजोखा पूर्ण मांडला जात नाही. कर वाचवण्यासाठी काही वेळा हे प्रकार केले जातात. मात्र, बरेच व्यापारी या व्यवहाराचा पैसा जमीनजुमला किंवा अन्य जंगम मालमत्तेत गुंतवतात. त्यामुळे त्यांच्या अडचणींवर लवकर उतारा मिळण्याची शक्‍यता आहे. काही व्यापाऱ्यांनी जुने येणे असल्याचे दाखवून हातातील काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग सुरू केला, तर काही जणांनी जुन्या तारखांच्या धनादेशाची शक्कल वापरली आहे. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्षाचा पगार आगाऊ, तर काही जणांनी उचल देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com