अँटिलिया उडवण्याची धमकी! मुकेश अंबानींसह कुटुंबियांना 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान : Ambani Family got Z+ Security | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambani Family Dance

Ambani Family got Z+ Security: अँटिलिया उडवण्याची धमकी! मुकेश अंबानींसह कुटुंबियांना 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान

मुंबई : देशातील बडे उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना 'झेड प्लस' सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टनं दिले आहेत. एनआयएनं याबाबत वृत्त दिलं आहे. (SC directs to provide highest level Z+ security cover to businessman Mukesh Ambani and his family)

एएनआयच्या वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टानं सरकारला आदेश दिलेत की, बिझनेसमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भारतात आणि परदेशातही 'झेड प्लस' सुरक्षा पुरवण्यात यावी. तसेच कोर्टानं हे ही स्पष्ट केलं की, अंबानी कुटुंबियांच्या भारतातील आणि परदेशातील 'झेड प्लस' सुरक्षेचा संपूर्ण खर्च त्यांच्याकडूनच वसूल केला जावा.

दरम्यान, नागपूर पोलिसांना नुकताच एक धमकीचा फोन आला होता. यामध्ये चित्रपट अभिनेते धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासह मुकेश अंबानी यांची घरं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर अंबानींच्या सुरक्षेत सर्वोच्च वाढ करण्यात आली आहे.