शेजवान चटणी जीवावर बेतली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मुंबई - शेजवान चटणीवरून झालेल्या वादातून वेटरने केलेल्या मारहाणीत विवाहितेला जीव गमवावा लागला. रविवारी (ता. २४) साकीनाका येथे ही घटना घडली. सबा दाऊद शेख (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. वेटर रशीद शेख याला पोलिसांनी अटक केली.

सबा ही पती दाऊद आणि त्यांच्या मित्रासोबत साकीनाक्‍याच्या जरीमरी येथील हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. त्या वेळी दाऊदने वेटर रशीदकडे शेजवान चटणी मागितली. त्यावर त्याने चटणी स्वत: उठून घ्या, असे सांगितले. यावरून त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रशीदने दाऊदला मारहाण केली. मध्यस्थीसाठी गेलेल्या सबाला रशीदने बुक्का मारल्याने ती जागीच कोसळली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Web Title: schezwan chutney women beating death crime