शाळा-कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कॅलरीजचा फलक! ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - विद्यार्थ्यांना जंकफूडपासून लांब ठेवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या कॅन्टीनमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थांच्या कॅलरीजची माहिती देणारे फलक लावणे आता सक्तीचे होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच अन्न व औषध प्रशासनामार्फत (एफडीए) राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.

शाळकरी विद्यार्थी व तरुणांमध्ये जंकफूडचे फॅड असल्याने लठ्ठपणा वाढून बाल आणि तरुण वयातच अनेक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या स्थूलतेबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी दादरमध्ये झालेल्या इव्हॉलव्ह २०१८ - सेलिब्रेशन ऑफ हेल्थ या चर्चासत्रात बॅरीॲट्रीक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी विद्यार्थ्यांमधील स्थूलतेचा मुद्दा मांडला. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

जंकफूडची विक्री करणारी दुकाने तसेच शाळेतील उपाहारगृहात मेन्यू कार्डवर संबंधित पदार्थांच्या कॅलरीबाबत चित्र स्वरूपात खुणा ठेवणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. चर्चासत्राला उपस्थित असलेल्या एफडीएच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी त्यांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

१०-२० % - देशातील मुले लठ्ठ
18.1 % - महिला लठ्ठ
15.9% - पुरुष लठ्ठ

 पौगंडावस्थेत हे प्रमाण ३० टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचते

Web Title: school college canteen calories board