शाळा, महाविद्यालयांच्या कॅंटीनमधील मेन्यू बदला

Canteen-Menu
Canteen-Menu

मुंबई - नव्या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयांतील कॅंटीनमधील मेन्यू बदलण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. फास्ट फूड, जंक फूड खाण्यामुळे विद्यार्थ्यांमधील वाढलेला लठ्ठपणा लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कॅंटीनमधील मेन्यूत बदल करण्याचे सूचनापत्र एफडीएने मुंबईसह राज्यातील शाळांना पाठवले आहे.

शाळेच्या मधल्या सुटीत बहुतेक विद्यार्थी कॅंटीनमधील वडा-पाव, चायनीज भेळ असे पदार्थ खातात. अनेक शाळांच्या कॅंटीनमध्ये बर्गर आणि डोनटसारखे पदार्थही मिळतात. या पदार्थांमध्ये मैदा, मीठ आणि साखरेचे अतिरिक्त प्रमाण असल्यामुळे मुलांमध्ये स्थूलता वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदवले आहे. वाढत्या वजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या कॅंटीनमधील फास्ट फूड, जंक फूडवर मर्यादा आणल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com