शाळेचे फाटक अंगावर पडून लहानग्याचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

कोपरखैरणे (नवी मुंबई) - महापालिकेच्या शाळेचे फाटक अंगावर पडून एका मुलाचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा यात जखमी झाला. सौरभ चौधरी (12) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. शेजारच्या रा.फ.नाईक शाळेतील विद्यार्थी बांधकाम सुरू असलेल्या शाळेच्या गेट जवळ खेळत असताना घडली घटना. 

आज सकाळी शाळेच्या फाटकाजवळ खेळत असताना फाटक निखळून मुलाच्या अंगावर पडला. यात सौरभ चौधरी गंभीर जखमी झाल्यामुळे वाशी एनएमएमसी रुग्णालयात  त्याला दाखल केले. मात्र प्रकृती खालवल्यामुळे मुलाला नजीकच्या हिरानंदानी फॉरटीज रुग्णालय येथे भरती केले असता दुपारी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या प्रकरणी महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाला जबाबदार धरले जात आहे. 

Web Title: The school gate falls on child and dies