फुप्फुसातील रक्तस्त्रावामुळे चांदनीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मुंबई : शाळेतून दिल्या गेलेल्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांमुळे गोवंडीतील पालिका शाळेत शिकणाऱ्या चांदनी शेखचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. चांदनीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या फुप्फुसात रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

चांदनीला राजावाडी रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. औषधांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप पालिकेने फेटाळून लावत चांदनीला संसर्ग झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिली. चांदनीचे शवविच्छेदन राजावाडी रुग्णालयातच करण्यात येणार येत होते; मात्र सायंकाळी उशिरा तिचा मृतदेह भायखळा येथील जेजे रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला. जेजेतील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी चांदनीचे शवविच्छेदन पूर्ण केले. त्यात तिचा मृत्यू फुप्फुसातील रक्तस्त्रावामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन पूर्ण होताच रात्री 12 वाजता चांदनीला गोवंडीतील रफीकनगर येथील कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले. 

गोळ्यांचा धसका कायम 
चांदनीचा मृत्यू पालिका शाळेमध्ये दिलेली गोळी खाल्ल्याने झाल्याचे समजताच धास्तावलेल्या पालकांनी आज शाळेला चांगलीच समज दिली. शाळेत माझ्या मुलांना गोळ्या देऊ नका, अशी स्पष्ट कल्पना अनेक पालकांनी शाळेला दिली आहे. त्या संबंधाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करत पालकांनी माझ्या मुलांना पालिकेकडून मिळणारी औषधे दिली जाऊ नये, असे स्पष्ट केले. माझ्या मुलांना मी बाहेरून औषधे देईन, पालिकेची नको, अशी स्पष्ट कल्पना साजरा खान यांनी दिली. 

Web Title: school girl death due to lung bleeding

टॅग्स