महापालिकेतर्फे शाळांना विनामूल्य मैदान

Mumbai-Municipal
Mumbai-Municipal

मुंबई - मुंबई शहर किंवा उपनगरांतील ज्या शाळांना स्वतःची मैदाने नाहीत, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मुंबई महानगरपालिकातर्फे आठवड्यातून १ तास विनामूल्य मैदान उपलब्ध करून दिले जाईल. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधान परिषदेत दिली.

मुंबईतील कुलाबा विभागातील सविता चंद्रशेखर या मैदानावर शौचालयाची व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधान परिषदेत दिली. सविता चंद्रशेखर या खेळाच्या मैदानावर शौचालयाची व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्याची लक्षवेधी सूचना आमदार भाई जगताप यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना सागर बोलत होते. मुलांना तिथे पिण्याचे पाणी किंवा शौचालयाची व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुलांची गैरसोय हाेत असल्यासंदर्भात ते बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com