काय सांगता ! शाळेत विलगीकरणात असलेल्या व्यक्ती चक्क घरात...

school quarantine
school quarantine

नागोठणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल, मुंबई, पुणे व इतर संवेदनशील गावावरून आलेल्या नागरिकांना स्कूल क्वारंटाईन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या आहेत. असे असतानाही नागोठण्यात २८ एप्रिलला पनवेल येथून आलेले पाच जण घरीच राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

नागोठणे परिसरांतील ग्रामीण भागातील अनेक गावांत यापुर्वी पनवेल-मुंबईहून आलेल्या नागरिकांना गावातील जिल्हा परिषद शाळेत किंवा मंदिरातच क्वारंटाईन केले होते. त्यामुळे यांना वेगळा नियम का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागोठण्यातील मिरानगर भागात पती-पत्नी व त्यांची ५ वर्षीय मुलगी तसेच दुसऱ्या आझाद मोहल्ला भागात १० व १२ वर्षीय दोन मुली असे एकूण पाच जण २८ एप्रिलला पनवेलहून नागोठण्यात आले. या सर्वांना त्या भागातील शाळेत स्कूल क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आले. असे असतानाच या भागातील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली असता शाळेत कुणीही स्कूल क्वारंटाईनमध्ये नसल्याचे व शाळेला कुलूप असल्याचे दिसून आले. 

रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या नवीन आदेशाप्रमाणे बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरातच होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या घराबाहेर होम क्वारंटाईनचा फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय या सूचनांचे आणि जमावबंदी आदेशाचे पालन संबधितांकडून होत आहे की, नाही याविषयी तेथील पोलिस निरीक्षकांना लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
- कविता जाधव, तहसीलदार, रोहा

school quarantined citizen in at home, read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com