पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

वडाळा - उन्हाळी सुटी संपवून चिमुकली पावले शाळेकडे वळली आणि मुंबईतील ठिकठिकाणच्या शाळेत प्रवेशोत्सवाचा एकच जल्लोष साजरा करण्यात आला.

फुले आणि फुगे लावून सजवलेले प्रवेशद्वार, मराठामोळा पेहराव आणि शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने शारदाश्रम शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. स्वागतासाठी ‘सकाळ’ने विद्यार्थी शिक्षक स्वागत आणि वाचन संस्कृती अभियान राबविले.

दर वर्षी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढावे म्हणून शाळेतील शिक्षक उत्साहाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक पद्धतीने स्वागत केले जाते. यंदा ‘सकाळ माध्यम समूहा’ची साथ मिळाली. डॉ. आंबेडकर भवन ट्रस्ट वरळीचे सहकार्य लाभल्याने शाळेचा पहिला दिवस कायम विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला. शिक्षणमहर्षी कै. सदानंद परुळेकर संस्थापकांच्या स्वप्नातून साकार झालेल्या मुंबईतील दादर पश्‍चिम भागातील शारदाश्रम विद्यामंदिर मराठी माध्यमाच्या शाळेच्या मराठी प्राथमिक  विद्यार्थी शाळेचा नवा गणवेश घालून, पाठीवर दप्तरे घेऊन शाळेत हजर होते. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि जास्तीत जास्त पुस्तकी ज्ञान मिळावे, यासाठी ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह ‘सकाळ’च्या अंकाचे वितरण करण्यात आले. शिक्षण पद्धती समजून सांगणारी ही पहिली शाळा असल्याचे गौरवोद्‌गार या वेळी कार्यक्रमानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आंबेडकर भवन ट्रस्ट वरळी या संस्थेचे अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले. सुटी म्हणजे फक्त मजा नसून नवीन काही तरी शिकण्याची एक अनोखी संधी असते, असा सल्ला मुख्याध्यापिका मनीषा ताडमारे यांनी विद्यार्थ्यांना दिला. या वेळी पोपट वाघमारे, शारदाश्रम विद्यामंदिरचे उपाध्यक्ष केशव सामंत, कार्यवाह मॉरिस पिंटो, प्रशासकीय अधिकारी प्रकाश परदेशी, विभाग निरीक्षिका वर्षा गांगुर्डे, माजी मुख्याध्यापिका कल्पना नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

बालमित्र मोफत
दर शनिवारी पुढील दहा आठवडे मोफत वृत्तपत्राचे वाटप विद्यार्थ्यांना ‘सकाळ’तर्फे करण्यात येणार आहे.

Web Title: school start student welcome