50 फूट दरीत कोसळलेला शालेय विद्यार्थी सुखरूप बाहेर

गजानन चव्हाण
मंगळवार, 7 मे 2019

खारघर : ट्रेकिंग करताना पन्नास फूट खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झालेल्या आणि अडकून पडलेल्या दहावीतील शालेय मुलांना डोंगराच्या पायथ्याशी व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खारघर फोरमच्या जोगर्स ग्रुपच्या सदस्यांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याने सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना खारघर डोंगरावर सकाळी घडली. गंभीर जखमी झालेल्या मुलांचे नाव दिग्विजय शिंदे  असे आहे.

खारघर सेक्टर वीस मधील दहावीचे शिक्षण घेणारी  पाच मुले सकाळी खारघर डोंगरावर पांडवकडा परिसरात ट्रेकिंग साठी गेली होती. त्यातील दिग्विजय शिंदे हा मुलगा ट्रेकिंग करताना पन्नास फूट खोल दरीत  कोसळला तर तीन मुले अडकून पडली. त्यातील एका मुलाने धावत येवून गोल्फ कोर्स शेजारी व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खारघर फोरम जोगर्स ग्रुपचे सदस्यांना घडलेली घटना सांगितली. फोरमच्या सदस्यांनी तात्काळ डोंगरावर धाव घेऊन पन्नास फूट खाली डोंगराव खोल दरीत पडून जखमी झालेल्या दिग्विजय आणि इतर तीन मुलांना बाहेर काढले.

यात दरीत कोसलेल्या  दिग्विजय यांच्या नाका तोंडा मधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव, तर शरीरावर बराच जखमा झाल्याने त्यास खारघर मधील मेडिसिटी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करून त्यास नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.डोंगरात अडकून पडलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी  खारघर फोरमचे सदस्य आणि पोलीस अधिकारी अर्जुन गरड, बालेश भोजने कृष्णा कदम, आनंद बैलकर, रवि नायर, विल्सनजी, अंकुश कदम, अनुराग गुप्ता, सतीश गायकवाड, सुरेशभाई पटेल, तुषार कोळपे, नितिन कोळपे आदींनी सहकार्य केले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School students collapsed in 50 feet valley who safe after help of Kharghar forum people