सामाजिक बांधिलकीचे ‘चांगभलं’

सामाजिक बांधिलकीचे ‘चांगभलं’

नवी मुंबई - औद्योगिक कंपन्यांकडून दर वर्षी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी खर्च केल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा महापालिकेने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला आहे. ॲमेझॉन, डी-मार्ट, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा, आयडीबीआय, एल ॲण्ड टी अशा सुमारे डझनभर कंपन्यांकडून महापालिकेने सुमारे ५२ शाळांकरिता अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, अद्ययावत फर्निचर, संगणक शिकवण्यासाठी शिक्षक व त्यांचे पगार संबंधित कंपन्यांकडून दिले जात आहेत. या कंपन्यांच्या देणग्यांमुळे डोक्‍यावर राहायला छत व पोटात अन्न नसलेल्या कुटुंबांतील मुलांना इंटरनेट असलेल्या संगणकांवर शिक्षण घेणे शक्‍य झाले.

महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल ४२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या गरीब दर्जेदार शिक्षण  देण्यासाठी पालिकेचा आटोकाट प्रयत्न असतो. याकरिता स्मार्ट क्‍लास, स्मार्ट बोर्ड, व्हर्च्युअल क्‍लास अशा अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. यात नामांकित कंपन्यांकडून सामाजिक बांधिलकीतून मिळणाऱ्या निधीचा सर्वाधिक वापर केला जात आहे. वर्षभरात महापालिकेला ॲमेझॉन, डी-मार्ट, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा, आयडीबीआय, एल ॲण्ड टी, हेन्कल, ग्लेनमार्क व इच वन टेक वन यांसारख्या कंपन्यांकडून मदतीचा हात पुढे आला आहे. या शाळांकरिता देणगी आलेल्यांपैकी डी-मार्ट या कंपनीने सर्वाधिक मदत केली आहे. डी-मार्टतर्फे ९ शाळांना प्रत्येकी २१ संगणक देण्यात आले आहेत. तसेच ९ शाळांमध्ये संगणक शिक्षक नेमून त्यांच्या वेतनाचा खर्चही याच कंपनीतर्फे केला जात आहे.

९ ग्रंथपालांसहीत नवनीत, ट्युलीप, प्रथम प्रकाशनांची पुस्तके, वाचनाकरिता टेबल आदी बाबी पुरवण्यात आल्या आहेत. १० शाळांची मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती आदी कामे करण्यात आली आहेत. तसेच दहावी इयत्तेच्या २१०० विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शिकांचे वाटप केले. १० शाळांमध्ये प्रत्येकी २१ संगणक देऊन शिक्षकांची तरतुद करून प्रयोगशाळा सुरू केली जाणार आहे. 

या दिल्या सुविधा
 हेन्कल - महापालिकेच्या ४ शाळांमध्ये अत्याधुनिक संगणक प्रयोग शाळा
 एलॲण्डटी - अद्ययावत विज्ञान व संगणक प्रयोगशाळा
 ॲमझोन - दोन विज्ञान प्रयोगशाळा व संगणक शिक्षक
 महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा - २ विज्ञान व संगणक प्रयोग शाळा, संगणक शिक्षक
 ग्लेनमार्क - ११ माध्यमिक शाळांकरिता ३० संगणक
 इच वन टेक वन - ८ शाळांमध्ये १२ संगणक शिक्षकांची नेमणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com