पालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सायन्स सेंटर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई - पालिकेच्या 175 शाळांमध्ये "मिनी सायन्स सेंटर' उभारण्यासाठी प्रशासनाने मान्यता दिली होती. हे काम मुंबईच्या स्टेम लर्निंग कंपनीच्या सहयोगाने सुरू आहे. लवकरच हे सेंटर्स सुरू होतील.

मुंबई - पालिकेच्या 175 शाळांमध्ये "मिनी सायन्स सेंटर' उभारण्यासाठी प्रशासनाने मान्यता दिली होती. हे काम मुंबईच्या स्टेम लर्निंग कंपनीच्या सहयोगाने सुरू आहे. लवकरच हे सेंटर्स सुरू होतील.

या सेंटरद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सोप्या पद्धतीने विज्ञानाबाबत आवड निर्माण करण्याचे प्रशिक्षण पालिकेच्या विज्ञान शिक्षकांना देण्यात आले. हे प्रशिक्षण सेंट्रल विभागात घाटकोपर येथील जयंतीलाल हिंद हायस्कूल, वेस्टर्न विभागात विलेपार्ले येथील एमएनपी स्कूल संकुल आणि मुंबई शहरात भायखळा येथील साध्वी सावित्रीबाई स्कूलमध्ये घेण्यात आले. यात महापालिकेच्या शाळांचे 150 हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. उर्वरित शिक्षकांना उद्या (ता. 22) प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सध्या स्टेम लर्निंगच्या साह्याने महापालिकेच्या 25 शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर चालवले जाते. यात 60 छोट्या-मोठ्या प्रयोगांच्या प्रतिकृती ठेवण्यात येतात. या उपक्रमाअंतर्गत स्टेम लर्निंगतर्फे लघु विज्ञान केंद्रे स्थापन करून मॉडेल डिझायनिंगच्या स्पर्धाही घेतल्या जातात; तसेच शास्त्रज्ञांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या मनात प्रयोगांविषयी कुतूहल निर्माण करण्याचे काम व प्रसिद्ध शास्त्रज्ञांशी संवादही या उपक्रमाद्वारे साधता येतो, अशी माहिती स्टेम लर्निंगचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष पंडित यांनी दिली.

Web Title: science center in municipal school