Mumbai Traffic Jam : एससीएलआर - एलबीएस कनेक्टिव्हिटीसाठी फ्लायओव्हर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SCLR  LBS connectivity flyover mumbai municipality spend 29 crore rupees to break traffic jam

Mumbai Traffic Jam : एससीएलआर - एलबीएस कनेक्टिव्हिटीसाठी फ्लायओव्हर

मुंबई : मुंबईत सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत हजर होते. एमएमआरडीएमार्फत या प्रकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला होता.

या प्रकल्पाशी संबंधित अशी पुढील कनेक्टिव्हिटीचे काम आता मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार एससीएलआर - एलबीएस रोड कनेक्टिव्हिटीसाठी फ्लायओव्हरचे काम हाती घेण्यात आले आहे.

सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड प्रकल्पाअंतर्गत एलबीएस रोडला कनेक्टिव्हीटीचा फ्लायओव्हरचा पर्याय सद्यस्थितीला नाही. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. सध्याच्या कुर्ल्यातील सीएसटी रोड ते एससीएलआर या प्रकल्पाला हा फ्लायओव्हर उपयुक्त ठरणार आहे.

या फ्लायओव्हरचा फायदा म्हणजे बीकेसी जंक्शन येथून तीन सिग्नल टाळण्यासाठीचा पर्याय असणार आहे. त्यामध्ये पहिला सिग्नल हा बीकेसी जंक्शन येथे आहे, तर दुसरा बीकेसी सीएसटी रोड जंक्शनला आहे. तर तिसरा एलबीएस रोड जंक्शन येथे आहे.

त्यामुळे तीन सिग्नल टाळत थेट घाटकोपरच्या दिशेने जाण्यासाठी हा पर्याय उत्तम ठरणार आहे. या ब्रीजची एकुण लांबी २४६ मीटर आहे. तर ब्रीजाठी एकुण २९.३८ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. या कामासाठी एकुण २४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

कुर्ला एल वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या अनधिकृत गॅरेजची दुकाने जर हटवण्यात आली असती तर या ब्रीजची गरजही लागली नसती. एससीएलआर प्रकल्पाअंतर्गत ब्रीज उभारताना एमएमआरडीएने १ हजार कोटी रूपये या पट्ट्यासाठी खर्च केले आहेत. तर एलबीएस कनेक्टिव्हिटीसाठी आता मुंबई महानगरपालिका २९ कोटी रूपये खर्च करणार आहे.