सीवूड्‌समधील शाळेजवळ भंगार वाहनांची अडगळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

तुर्भे - सीवूड्‌स सेक्‍टर 44 मधील पोद्दार इंटरनॅशनल शाळेजवळच्या रस्त्यावर क्रेन व इतर भंगार वाहने पडून असल्याने त्याचा त्रास विद्यार्थी आणि पालकांना होत आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडीचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिका इतर ठिकाणची भंगार वाहने हटवत असताना येथील वाहने का हटवत नाही, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

पाम बीच मार्गालगत सेक्‍टर 44 येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या बाजूला अनेक वर्षांपासून भंगार वाहने उभी आहेत. त्यामुळे शाळा सुटताना आणि भरताना येथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ही वाहने हटवण्याची मागणी अनेकदा नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे; परंतु पालिका आणि वाहतूक पोलिस याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

येथील रस्त्यावर अनेक वर्षांपासून उभी असलेली क्रेन व इतर भंगार वाहने गर्दुल्ले आणि भुरट्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. त्यामुळे येथे छेडछाडीच्या घटना घडतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनमालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या भंगार वाहनांमुळे पालिका कर्मचाऱ्यांना हा परिसरही साफ करता येत नाही. याबाबत बेलापूरचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्याशी संपर्क साधला असता पाहणी करून कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. 

महापालिका किंवा वाहतूक पोलिसांनी भंगार वाहने हटवली नाहीत तर भंगार वाहने हटाव मोहीम हाती घेतली जाईल. या वाहनांबाबत महापालिका आयुक्त आणि वाहतूक पोलिसांना निवेदन दिले जाईल. 
- अमर पाटील, अध्यक्ष, नवी मुंबई भाजप युवा मोर्चा 

Web Title: Scrape of vehicles in seawoods