भंगार व्यावसायिकाचा शॉक लागून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीतील कंपनीमध्ये भंगाराचे सामान घेण्यासाठी गेलेल्या हाफिजउल्ला गरीबबुल्ला चौधरी (28) या तरुणाला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. 

या घटनेतील मृत हाफिजउल्ला चौधरी हा दिघा येथील सुभाष नगर भागात राहावयास होता. तसेच तो भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. हाफिजउल्ला हा रबाळे एमआयडीसीतील वैभव इंजिनीयरिंग वर्कशॉपमध्ये भंगाराचे साहित्य घेण्यासाठी गेला होता. या वेळी तो भंगाराचे सामान घेऊन जात असताना तेथील डीएस मोल्डिंग व इंजिनीयरिंग कंपनीसमोर त्याला विजेचा शॉक लागला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Web Title: scraping businessman dead for Shock