संपुर्ण मुंबईचे झाले स्क्रिनींग; मुंबई महापालिकेनं केला दावा.. 

corona screening
corona screening

मुंबई: मुंबईतील 1 कोटी 26 लाख नागरीकांचे स्क्रिनींग करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.यात 5 लाखाहून अधिक जेष्ठ नागरीकांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यात आली असून 99.5 टक्के जेष्ठ नागरीकांची ऑक्सिजन पातळी 95 टक्क्यांवर आहे.

मुंबईतील 2016 ची अंदाजित लोकसंख्या 1 कोटी 26 लाख 89 हजार 644 आहे.तर महापालिकेने कोविड प्रतिबंधासाठी 1 कोटी 26 लाख 7 हजार 692 नागरीकांचे स्क्रिनींग केल्याचा दावा केला आहे.

कोविड मुळे माणसाच्या श्वसनयंत्रणेवर  परीणाम होत असल्याने पालिकेने झोपडपट्ट्यांमधिल जेष्ट नागरीकांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यास सुरुवात केली. यात 5 लाख 10 हजार 486 जेष्ट नागरीकांची तपासणी करण्यात. यात फक्त 2 हजार 271 नागरीकांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी 95 टक्क्यांपेक्षा कमी होती.त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. तसेच ज्या जेष्ट नागरीरांना इतर दिर्घकालीन आजार होते त्यांनाही नियमीत औषधे सुरु ठेवण्याची शिफारस करण्यात आली.

साधारण 95 टक्क्यांपर्यंत रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण असल्यात त्या व्यक्तीची श्वसन यंत्रणा ठिकठाक काम करते असे मानले जाते. त्यामुळे ही चाचणी करण्यात आली होती.असे पालिकेकडून सांगण्यात आले.

एल कुर्ला प्रभागात सर्वाधिक 1 लाख 76 हजार जेष्ट नागरीकांची तपासणी झाली.त्या खालोखाल के पुर्व अंधेरी पुर्व मध्ये 34 हजार 666 नागरीकांची आणि वरळी प्रभादेवी परीसरातील 34 हजार 193 नागरीकांची तपासणी 2 जून पर्यंत झाली असल्याची आकडेवारी पालिकेने जाहीर केली आहे.

screening done in whole mumbai bmc claimed 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com