पनवेल : खेळाडूच्या डोक्यात कोयत्याने हल्ला; पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

scythe attack
scythe attacksakal media

पनवेल : क्रिकेट सामना हरल्याचा राग सहन न झाल्याने (cricket match) विरोधी संघाच्या व्यवस्थापकाने विजयी संघातील खेळाडूच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात खेळाडू ( scythe Attack on player) गंभीर जखमी झाला असून त्याला पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी (culprit arrested) आरोपीला अटक केली आहे.

scythe attack
रायगड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने; कोरोना रुग्णसंख्या १० पेक्षा कमी

पनवेल तालुक्यातील पोयंजे गावातील क्रिकेट मैदानात ६ मार्च रोजी क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात स्वरूपा इलेव्हनचा सेवन स्टार संघाने पराभव केला. त्यानंतर विजेत्या खेळाडूंनी मैदानात आनंद व्यक्त करण्यासाठी जल्लोष सुरू केला.

याचा स्वरूपा इलेव्हन संघाचा व्यवस्थापक महेंद्र जनार्दन गायकर (४०) याला राग आला. त्यामुळे त्याने जवळ असलेला कोयता घेऊन शशिकांत वसंत सोनटक्के (५०) याच्या डोक्यात मारला. यानंतर महेंद्र याने त्याला शिवीगाळ करून पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी देऊन पलायन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com