प्रजासत्ताक दिनामुळे किनाऱ्यांवर दक्षता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता असल्याने पोलिस, फोर्स वन, दहशतवादविरोधी पथक, नौदल, तटरक्षक दल यांनी सुरक्षेत वाढ करावी, अशा सूचना देण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर फोर्स वन मुंबई परिसरातील बंदरांत विशेष ‘मॉक ड्रिल’ करणार आहे. 

नौदलाने सागरी पोलिसांच्या मदतीने हेलिकॉप्टरमधून समुद्रावर गस्त सुरू केली असून, सागर सुरक्षा कवच मोहीम राबवली जात आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी बंदरात समुद्रमार्गे स्फोटकांचा साठा उतरवण्यात आला होता. त्यानंतर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी समुद्रामार्गेच मुंबईत दाखल झाले होते. भारतात पुन्हा दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचला असण्याची शक्‍यता ध्यानात घेऊन केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी किनाऱ्यांवर ‘हाय अलर्ट’ जाहीर केला. 

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत तटरक्षक दलाने तळ उभारले असून, नौदलानेही तळ उभारण्यास सुरवात केली आहे. हे तळ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. 

Web Title: Sea Beach Security for Republic Day