सीवूडस्‌मध्ये सम-विषम पार्किंगचा बोजवारा

सीवूडस्‌मध्ये सम-विषम पार्किंगचा बोजवारा
सीवूडस्‌मध्ये सम-विषम पार्किंगचा बोजवारा

नवी मुंबई : सीवूडस्‌ ग्रॅण्ड सेंट्रल मॉल परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी, पार्किंगच्या समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी. या उद्देशाने वाहतूक विभागाने या ठिकाणी सम-विषम पार्किंग सुरू केले आहे. मात्र, या योजनेला धाब्यावर बसवत बेशिस्त वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करत आहेत. त्यामुळे रोजच येथे वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनासह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. 

सीवूडस्‌मधील रहिवाशांना रोजच ग्रॅण्ड सेंट्रल मॉल परिसरात वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. शनिवार व रविवारी या दोन दिवसीय सुट्यांच्या काळात तर या त्रासात अधिकच भर पडते. मॉलसमोरून डी-मार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना कपडे, तसेच खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ अधिक असते. ३० फूट रुंदीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंना पाच फुटांचा मार्जिनल स्पेस, पदपथ आहे. तेथेही बाकडे मांडून फेरीवाले, विक्रेते बसलेले आढळतात. त्याशिवाय रस्त्याशेजारीही फळविक्रेते, भाजीविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागलेल्या असतात. त्यातच भर म्हणून रस्त्याच्या दुतर्फा सम-विषम पार्किंगचा फलक लागलेला असतानाही तारखांचे बंधन न पाळता दोन्ही बाजूंना बिनदिक्कत वाहने उभी केली जातात. त्यामुळे नागरिकांना येथून मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे. संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत तर या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते; मात्र वाहतूक पोलिसांकडून येथे कारवाई होत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. 

पार्किंगचे नियम न पाळता वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यातच खाद्यपदार्थांच्या दुकानांसमोरही मोठी गर्दी असते. त्यातच कित्येक जण पदपथावरच उभे राहून खात असल्याने तेथून चालणे कठीण जाते. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी असे दुकानदार व बेकायदा पार्किंगवर कारवाई करणे गरजेचे आहे. 
- अमित भोसले, स्थानिक नागरिक.

वाहतूक विभागामार्फत नियमित कारवाई होत आहे. टोईंग नसल्याने परिणामकारक कारवाई करता येत नाही.
-ई. एस. शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com