मुंबईत २६/७ नंतरचा दुसरा मोठा पाऊस

मुंबईत २६/७ नंतरचा दुसरा मोठा पाऊस

मुंबई -  मुंबईत सोमवारी (ता. १)  ३७५.२ मिलिमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली. २६ जुलै २००५ रोजी ९४४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर काल झालेल्या पावसाचा क्रमांक लागतो.

जूनच्या अखेरीला जोर धरलेल्या पावसाची संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ‘बॅटिंग’ सुरू आहे. मुंबईत संततधारेमुळे जनजीवन विस्कळित झाले. काल सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला होता. शुक्रवारपर्यंत (ता. ५) संपूर्ण कोकणासाठी पावसाला अनुकूल वातावरण आहे. बुधवारपासून (ता. ३) पावसाला पुन्हा जोर येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण छत्तीसगड आणि नजीकच्या भागांत असलेली वाऱ्यांची चक्राकार स्थिती, तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, अगोदरपासूनच दक्षिण गुजरातजवळ असलेली वाऱ्यांची चक्राकार स्थिती आणि जवळच्या भागांत समुद्रसपाटीवर पुरेसे बाष्प निर्माण करणाऱ्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. 

राज्यातील स्थिती
सिंधुदुर्ग 
    दोन दिवसांपासून जोर ओसरला  
    मुंबईतील पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित
रत्नागिरी
    आतापर्यंत सरासरी ७० टक्केच
    पाणीटंचाईतून अद्यापही पूर्ण मुक्तता नाही 
कोल्हापूर 
    शहरात जिल्हा पोलिस प्रमुखांच्या घराजवळची भिंत कोसळली
    सांगलीत फारसा पाऊस नाही.
    १५ बंधारे पाण्याखाली
सातारा
    कोयना धरण परिसरात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात वाढ
    साताऱ्यात दरड कोसळली
सोलापूर
    सहा जणांचा मृत्यू; त्यापैकी दोघांना आठ लाखांची मदत
    १७ जनावरांचा मृत्यू 
    सुमारे ७०९ घरांची पडझड

नाशिक
    विजेचे ३५४ खांब पडले
    शहरात दीडशेवर झाडे कोसळली
    खरिपाच्या दीड-दोन टक्के पेरण्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com