मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप चालूच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या अघोषीत संपाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईत दुसऱ्या दिवशीही संप सुरूच असून परळ आगार पूर्णतः बंद आहे, तर मुंबई सेंट्रल, कुर्ला, पनवेल, उरण डेपोतून काही फेऱ्या रवाना झाल्या आहेत.

मुंबई सेट्रलवरुन सकाळी फक्त एक एसटी रवाना झाली. परेल, कुर्ला, मुंबई सेट्रल, पनवेल, उरण असे  डेपो आहेत. ठाण्यात खोपट व वंदना डेपो शुकशुकाट आहे.पनवेल मधून पूर्ण वाहतूक बंद झाली आहे. जोरदार पावसात लोकांचे प्रचंड हाल होत असून खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी दुप्पट भाडे वसूली सुरू केली आहे.

काल पासून सुरू झालेल्या एसटी कर्माचाऱ्यांच्या संपाला मुंबईत आज पुन्हा प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर प्रवाश्यांनीही संप सुरूच रहणार हे गृहीत धरून बस स्थानकात येण्याचे टाळले. परिवहन विभागाने खासगी बस, स्कूल बस यांना प्रवाशी वाहतूकीस परवानगी दिल्याने प्रवाश्यांची आर्थिक लूट सुरू आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवाश्यांना अन्य पर्याय नसल्याचे दिसत आहे.

Web Title: on second day hunger strike continues in mumbai