
किशोरवयीन मुलांच्या दुसऱ्या डोसला सुरुवात; 6115 जणांना मिळाला लसीचा पहिला डोस
मुंबई : मुंबईतील (Mumbai) किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण मोहीम (teenagers vaccination drive) 3 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी 6115 किशोरांना लसीचा पहिला डोस (First dose) मिळाला होता. सोमवारपासून दुसरा डोस (second dose) देण्याची सुरुवात झाली आहे. सोमवारी लसीच्या दुसऱ्या डोसची तारीख होती, परंतु केवळ 15 टक्के म्हणजेच 949 किशोरवयीन मुलांनी लसीचा दुसरा डोस घेतला. उर्वरित 85 टक्के किशोरवयीन मुले लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रापर्यंत पोहोचले नाहीत.
हेही वाचा: आकाशवाणीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून; सकाळच्या सभेत बदल
15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना कोव्हॅक्सीन लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. याअंतर्गत या किशोरांना कोव्हॅक्सीचा डोस दिला जात आहे. पहिल्या दिवशी 6115 किशोरांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. 28 दिवसांनंतर, त्यांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा होता. नियमांनुसार, सोमवार 31 जानेवारी हा दुसरा डोस घेण्याची तारीख होती परंतु बहुतेक किशोरवयीन मुले दुसरा डोस घेण्यासाठी आले नाहीत.
पालिका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत किशोरवयीन मुलांना लसीचे 2,87,828 डोस देण्यात आले आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, किशोरवयीन मुलांना अनेकदा वाटते की ते दुसरा डोस आरामात घेऊ शकतील. म्हणूनच अनेक किशोरवयीन मुले दुसऱ्या डोससाठी केंद्रात पोहोचले नसतील.
Web Title: Second Dose Vaccination Has Been Started For Teenagers More Than Six Thousand People Got First Dose
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..