आयएनएस खांदेरी पाणबुडीचे जलावतरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुबंईतील माझगाव डॉक शिपबिलर्ड्स लिमिटेड (एमडीएल) येथे झालेल्या या कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांच्या उपस्थितीत जलावतरण करण्यात आले.

मुंबई - स्कॉर्पिन श्रेणीतील दुसरी आयएनएस खांदेरी या पाणबुडीचे आज (गुरुवार) माझगावमध्ये जलावरतण करण्यात आले. 

मुबंईतील माझगाव डॉक शिपबिलर्ड्स लिमिटेड (एमडीएल) येथे झालेल्या या कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांच्या उपस्थितीत जलावतरण करण्यात आले. एमडीआयएल आणि डीसीएनएस या फ्रेंच कंपनीच्या सहभागातून पाणबुडीची बांधणी करण्यात आली.

याचवर्षी डिसेंबरपर्यंत पाणबुडीच्या सर्व चाचण्या घेऊन ती नौदलात सहभागी करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने सागरीसिद्धता तपासली जाईल. या पाणबुडीवर जहाजांवर मारा करणारी क्षेपणास्त्रे ही लावण्यात येणार आहेत. मराठा राजवटीने 17 व्या शतकात युद्धासाठी समुद्रात खांदेरी बेटाचा वापर केला होता. त्यामुळे या पाणबुडीला नाव देण्यात आले आहे.

Web Title: Second Scorpene class submarine Khanderi launched in Mumbai