पालघर जिल्हयातील माध्यमिक शाळा दुसरया दिवशीही बंद

प्रमोद पाटील 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सफाळे - आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पालघर  जिल्हयातील अनुदानित माध्यमिक शाळांनी मंगळवार पासून तीन दिवसांचा संप पुकारला असून, जिल्हयातील माध्यमिक शाळा बुधवारी (ता.8) दोखील बंद होत्या. शाळा बंद संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. 

सफाळे - आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पालघर  जिल्हयातील अनुदानित माध्यमिक शाळांनी मंगळवार पासून तीन दिवसांचा संप पुकारला असून, जिल्हयातील माध्यमिक शाळा बुधवारी (ता.8) दोखील बंद होत्या. शाळा बंद संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. 

राज्यात दिनांक 7 ते 9 ऑगस्ट 2018 दरम्यान सुरू असलेल्या संपात सर्व सरकारी- निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना सहभागी झाल्या आहेत. शासनाने सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती करावी तसेच विशेषतः पालघर जिल्हयात शिक्षण विभागाचे लेखाधिकारी व वेतन पथक कार्यालय सुरू करावे आदी विविध मागण्यांवर शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने राज्य समन्वय समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालघर जिल्हयातील सर्व अनुदानित माध्यमिक शाळा दि. 7, 8 व 9 ऑगस्ट अशा तीन बंद झाल्या असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या विविध संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. या संपात राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण सतरा लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत.  बुधवारी संपाचा दुसरा दिवस आहे. हा संप गुरुवार पर्यंत चालणार आहे. या तीन दिवसांत शासनाने मागण्या मान्य न केल्यास संस्थाचालकांनी पुढील महिन्यात शाळा बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासनाकडून जो पर्यंत आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत म्हणजेच तीन दिवस संप सुरूच राहिल. मात्र शासनाने जर मागण्या मान्य केल्यास संप मागे घेण्यात येईल असे पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॅरेल डिमेलो यांनी सांगितले. 

Web Title: The secondary school in Palghar district is closed for the second day