
रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादासंबंधित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होतेय. न्यायालयीन सुट्टीचा दिवस असतानाही आज निकालाचं वाचन करण्यात आलं. निकालाच्या संवेदनशीलतेमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव निकालाचा शनिवारचा दिवस निवडण्यात आल्याचं बोललं जातंय. अशातच मुंबईत आता जमावबंदीचे आदेश जारी केलेत. हे आदेश आज सकाळी 11.00 ते उद्या सकाळी 11.00 पर्यंत हे आदेश लागू होणार आहेत. मुंबईत आज सकाळी अकरा पासून उद्या सकाळी अकरा पर्यत कलम 144 लागू करण्यात आला आहे.
रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादासंबंधित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होतेय. न्यायालयीन सुट्टीचा दिवस असतानाही आज निकालाचं वाचन करण्यात आलं. निकालाच्या संवेदनशीलतेमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव निकालाचा शनिवारचा दिवस निवडण्यात आल्याचं बोललं जातंय. अशातच मुंबईत आता जमावबंदीचे आदेश जारी केलेत. हे आदेश आज सकाळी 11.00 ते उद्या सकाळी 11.00 पर्यंत हे आदेश लागू होणार आहेत. मुंबईत आज सकाळी अकरा पासून उद्या सकाळी अकरा पर्यत कलम 144 लागू करण्यात आला आहे. शांतता आणि शांतता आणि सलोखा कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे.
अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीनसंदर्भात आज (शनिवार) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून, याठिकाणची वादग्रस्त जमीन तीन पक्षकारांना समान हिश्श्यांमध्ये विभागून देण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत या जागेचे त्रिभाजन करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. येथील वादग्रस्त जमीन हिंदूंचीच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 1950 पासून न्यायालयात असलेल्या या प्रकरणाच्या निकालाबाबात देशभरात उत्सुकता आहे.
मशिदीच्या जागेत आधी मंदिराचे अवशेष : सर्वोच्च न्यायालय
बाबरी मशीद ज्याठिकाणी उभारली होती. त्याठिकाणी मोठी वास्तू होती आणि जुने स्तंभ व दगड होते. मशीदिच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर केला होता. मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचा पुरातत्व विभागाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. हिंदूकडून तेथे पुजा करण्यात येत होती, असे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.
मशीद कधी बांधली यावरून फरक पडत नाही. बाबरच्या काळात मशीद उभारण्यात आली. बाबरी मशीद रिकाम्या जागी बनलेली नव्हती. 1949 मध्ये मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचा दावा न्यायालयाने फेटाळला. तसेच निर्मोही आखाड्याचाही दावा न्यायालयाने फेटाळला. निर्मोही आखाडा सेवक नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. रामलल्लाला न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली.
अयोध्या