Mumbai : एसटीची सुरक्षा बेभरोसे; वर्षभर मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद रिक्त,राज्य सरकारला विसर!

राज्यात एसटी महामंडळाचे ३१ विभाग, २५० डेपो आणि ५८०पेक्षा जास्त बसस्थानक
Security ST post of chief security and vigilance officer is vacant for a year state government
Security ST post of chief security and vigilance officer is vacant for a year state governmentesakal

मुंबई : गेल्या वर्षभरापासून एसटी महामंडळातील मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी हे पद रिक्त आहे. त्यामुळे लालपरीची सुरक्षा रामभरोसे असून अनेक प्रकरणाच्या तपास रखडला आहे. परंतु अद्याप राज्य सरकारने या पदावर कोणाची नियुक्ती केली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे नुकसान होत आहे.

राज्यात एसटी महामंडळाचे ३१ विभाग, २५० डेपो आणि ५८०पेक्षा जास्त बसस्थानक आहे. सध्याच्या घडीला १४ हजार पेक्षा जास्त एसटी बसमधून दररोज ५५ लाखपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत आहे. सध्या तर, उन्हाळी सुट्टीमुळे एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. राज्याच्या प्रत्येक आगारात,बसस्थानकात प्रवाशांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे प्रवाशांची आणि एसटी महामंडळाच्या सुरक्षेची जबाबदारी महामंडळातील सुरक्षा दक्षता खात्यावर आहे. परंतु, गेल्या वर्षभरापासून एसटी महामंडळातील मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी हे पद रिक्त आहे. त्यामुळे एसटीच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण वाढते आहे.

याशिवाय विना तिकिट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कोणाचाही अंकुश नसल्याने महामंडळाचा दिवसाला सुमारे १ ते २ कोटीचा महसुल बुडतो आहे. याशिवाय बस स्थानकावरुन अवैध व खाजगी प्रवासी वाहतुक सुरु असल्याने देखील महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे.

काय आहे पद-

रा.प. महामंडळाच्या संरचनेनुसार सुरक्षा व दक्षता खाते हे एक प्रमुख व महत्वाचे खाते आहे. या खात्याच्या प्रमुख पदी भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिका-यांची प्रतिनियुक्ती शासनातर्फ़े करण्यांत येते. सुरक्षा कामाचे बाबत हे खाते प्रामुख्याने महामंडळाचे "डोळे व कान" असे संबोधले जाते.

या खात्याचे महत्व जाणुनबुजून महामंडळाने १९८२ पासून "सुरक्षा व दक्षता खाते" म्हणून संबोधले आहे.या खात्याची कामे गोपनीयरित्या करण्यांत येतात. यापूर्वी एसटी महामंडळामधून मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी एम.के.भोसले(आयपीएस )हे ३० जून २०२२ रोजी निवृत्त झाले. त्यानंतर आतपर्यत राज्य शासनाने या रिक्त पदावर आज अखेर कोणाचीही नियुक्ती केलेली नाही.

सुरक्षा व दक्षता खात्याची कार्ये व कर्तव्ये

- मालमत्तेचे व सामुग्रीचे रक्षण करणे.

- अवैध प्रवासी वाहतूक तपासणी करण्यामध्ये मदत करणे.

- दक्षता : अफ़रातफ़र, आर्थिक गैरप्रकार व महामंडळाचे आर्थिक नुकसान करणारी प्रकरणे उघडकीस आणणे.

- चौकशी : मंत्र्यांचा, अध्यक्ष व इतरांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करणे.

- बस तपासणी : महामार्ग व निर्गम परिसरातील मार्गावर धावणा-या बसेसची वेळावेळी तपासणी करणे.

- प्रवाशांची सुरक्षितता : प्रवाशांची सुरक्षितता अबाधित रहावी म्हणून बसेसवर काम करणारे चालक मद्यपान करुन अति वेगाने व निष्काळजीपणाने बस चालवितात किंवा कसे ? याची अधूनमधून शहानिशा करणे.

- कोट्यावधी रुपयांचे इंधन, वंगण, भांडार सामानाची खरेदी केल्यावर त्याची आवक / जावक व्यवस्थित होते किंवा नाही त्याबद्दलची तपासणी करणे.

- कोट्यावधी किंमतीचे भंगार माल विकल्यावर त्याचे वितरण करतांना गैरप्रकार होवू नये म्हणून त्यावर देखरेख ठेवणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com