समुद्रकिनारा सुरक्षेसाठी ‘बेवॉच’ पाहा - न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई : ‘समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा कशी ठेवावी, यासाठी हॉलिवूडची ‘बेवॉच’ ही अमेरिकन मालिका पाहा आणि त्यातून काहीतरी शिका’, असा सल्ला मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह मुंबई महापालिकेला दिला. आगामी गणेशोत्सवात विसर्जनासाठी समुद्रकिनाऱ्यावर अत्याधुनिक सोई-सुविधांसह जीवरक्षक उपकरणांचा वापर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. २०१६ मध्ये मुरूड जंजिरा समुद्रकिनाऱ्यावर १४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेसाठी जनहित मंचने जनहित याचिका दाखल केली आहे. 

Web Title: See Bay Watch For beach safety