सेल्फीमुळे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद

सेल्फीमुळे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद


नेरळ : चोरीच्या उद्देशाने घरफोडी करून चोरटा घरात घुसला; तसेच त्याने घरातील रक्कमदेखील चोरली. मात्र, याचवेळी घरमालकाचा फोन हाताळताना चोरट्याचा सेल्फी फोटो फोनमध्ये सेव्ह झाल्यामुळे या चोरट्याच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गौतम विलास माने (वय ३७) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीस नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.

गेली अनेक वर्षे नेरळ परिसरातील बेकरे, नेरळ, आंबिवली, भडवळ, उकरूळ, पोशीर, नेरळपाडा अशा अन्य ठिकाणी घरे, दुकानांत चोरट्याने चोऱ्या केल्या होत्या. त्याच्याकडून ३० तोळे सोने, रोख रकमेसह हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. मोबाईलमधील सेल्फ पॅटर्न लॉकमुळे अनेक वर्ष घरफोडी करणारा चोर जेरबंद करण्यात नेरळ पोलिसांना यश आले.मिळलेल्या माहितीनुसार फिर्यादी दीनानाथ मालू कराळे यांच्या राहत्या घरातून ३ नोव्हेंबर रोजी चोरट्याने ८५० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. त्याच दरम्यान चोरटा कराळे यांचा मोबाईल हाताळत असताना त्याचा सेल्फी मोबाईलमध्ये सेव्ह झाला होता. या अनुषंगाने नेरळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपीची माहिती काढून आरोपीला नेरळ कोल्हारे चारफाटा येथे जेरबंद केले.


अनेक चोऱ्यांची दिली कबुली   
या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने नेरळपाडा, भडवळ, उकरूळ, आंबिवली, पोशीर अशा अनेक ठिकाणी घरफोड्या, चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्याचाकडून सुमारे ३० तोळे वजनाच्या लगडी कर्जत येथून पोलिसांनी हस्तगत केल्या असून तीन हजार २०० रुपये रोख रक्कम आणि चोरी करण्याकरिता वापरत असलेली साधने आरोपीच्या घरातून पोलिसांनी जप्त केली आहेत. त्याने नेरळ परिसरात सात ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com