मल्टिप्लेक्‍समध्ये पदार्थांची विक्री कशी? 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मुंबई - राज्यभरातील मल्टिप्लेक्‍समध्ये घरचे खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसल्यास तेथे खाद्यपदार्थांची विक्री कशी होते, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केला. मल्टिप्लेक्‍समध्ये घरून किंवा बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करण्यात येते, अशी तक्रार करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते जैनेंद्र बक्षी यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. एस. एम. केमकर आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

मल्टिप्लेक्‍समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे आणि पाण्याच्या बाटल्यांचे दरही अधिक असतात. याचा अनुभव आम्हीही घेतला आहे. हे खाद्यपदार्थ नियमित दरांप्रमाणे का विकले जात नाहीत, असाही प्रश्‍न खंडपीठाने केला. बाहेरून खाद्यपदार्थ नेण्यास मनाई केली जात असल्यास अन्य व्यावसायिकांनाही तेथे खाद्यपदार्थ विकण्यास मनाई करायला हवी, असेही खंडपीठ म्हणाले. राज्य सरकार मल्टिप्लेक्‍सबाबत लवकरच धोरण निश्‍चित करणार आहे. सहा आठवड्यांत त्यावर अंतिम निर्णय होऊ शकेल, अशी माहिती सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी खंडपीठाला दिली. 

Web Title: sell foods in multiplex