पश्‍चिम रेल्वेवर सेमी  एसी लोकलच्या चाचण्या

पश्‍चिम रेल्वेवर सेमी  एसी लोकलच्या चाचण्या

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या पहिल्या सेमी वातानुकूलित (एसी) लोकल डब्यांची अंतिम रचना ठरली आहे. यामध्ये सहा एसी आणि सहा साधे डबे अशी १२ डब्यांच्या सेमी एसी लोकलच्या चाचण्या पश्‍चिम रेल्वेवर डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत.

पश्‍चिम रेल्वेवर धावत असलेल्या एसी लोकलमुळे सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतात. त्यामुळे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सेमी एसी लोकल चालविण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पश्‍चिम रेल्वेवर पहिली १२ डब्यांच्या एका सेमी लोकल बनविण्यात आलेली आहे. त्यामध्ये ६ एसी आणि ६ साधे डबे असणार आहेत. सेमी एसी डब्यांमध्ये १ हजार ९६ तर साध्या डब्यांमध्ये १ हजार १५६ आसनक्षमता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com