कोविंद यांना शिवसेनेचा पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठींबा जाहीर केला.राष्ट्रपती पदाच्या सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने एनडीएच्या विरोधात निर्णय घेतला होता. त्यामुळे यंदाही शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठींबा जाहीर केला.राष्ट्रपती पदाच्या सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने एनडीएच्या विरोधात निर्णय घेतला होता. त्यामुळे यंदाही शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

राष्ट्रपतीपदाच्या भाजपने ठरवलेल्या उमेदवाराच्या पाठिंब्याबाबात आज संध्याकाळी मातोश्री येथे शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली.या बैठकीत विरोधकांकडून कोणताही उमेदवार जाहीर झाला नाही. तसेच,कोविंद यांना विरोध करण्याचे कारण नाही अशी भूमिका नेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोविंद यांना पाठींबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला.या बैठकीनंतर मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परीषदेत उध्दव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला.

सोमवारी शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात जातीय राजकरणासाठी कोविंद यांना उमेदवारी जाहीर केली असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ठाकरे म्हणाले,"कोविंद हे साधे सरळ व्यक्ती आहेत.सामान्य कुटुंबांतून ते वर आले आहेत.चांगल काम करणार असतील, तर पाठिंबा द्यायाला हरकत नाही. भाजपच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याचे काम शिवसेना करत नाही.पण,जे आवडत नाही त्याला विरोध करतच राहू.वस्तु सेवा करात शिवसेनेच्या माणगीमुळे महापालिकांना अनुदान मिळणार आहे.आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्‍नही असाच सोडवू असे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेने सरसंघचालक मोहन भागवत आणि कृषीतज्ञ एम.एस.स्वामीनाथन यांचे नाव सुचवले होते. मग आता शिवसेना कोविंद यांना पाठिंबा कशी देते, असे विचारले असता ते म्हणाले, "स्वामीनाथन यांच्या नावाचा विचार भाजपने केला होता. मात्र,त्यांच्या वया मुळे उमेदवारी देता आली नाही. असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले असल्याचे त्यांनी नमुद केले. तर,विरोधकांकडून स्वामीनाथन यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यावर आम्ही नाव सुचवून खूप दिवस झाले. आताही ते विचार करत आहे.असा टोला त्यांना विरोधकांना मारला.

Web Title: sena backs kovind