नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत सेना मंत्री आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्या बैठक घेणार असल्याचे समजते. 

मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्प रेटण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये उभी फुट पडली आहे. नाणार प्रकल्पाचे पडसाद आज मंत्रिमंडळ बैठकीत पडले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक पावित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिव्र नाराजी व्यक्त करीत निषेध नोंदविला असल्याचे समजते.

सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्या बैठक घेणार असल्याचे समजते. तसेच प्रकल्प रेटायचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला. 

रत्नागिरी जिल्ह्यात नाणारमधील प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. मात्र, हा विरोध झुगारत सोमवारी (ता. 25 जून) सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये 3 लाख कोटींच्या सामंजस्य करारावर नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावर बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sena Minister Gets Aggressive About Nanar Project Issue