esakal | 'भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने म्हटले की, पक्ष बदलता आला तर बदलून टाका'' - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

'भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने म्हटले की, पक्ष बदलता आला तर बदलून टाका'' - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

'भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने म्हटले की, पक्ष बदलता आला तर बदलून टाका'' - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - माजी महसूल मंत्री आणि खानदेशातील मातब्बर नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 'दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही आपल्याला दूसऱ्या पक्षात जा असे सांगितले असा गौप्यस्फोट' खडसे यांनी यावेळी केला. 

''त्यांनी मला ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेल' - एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

एकनाथ खडसे हे खानदेशातील मोठे नेते आहेत. भारतीय जनता पक्षात त्यांनी 40 वर्ष काम केले. परंतु गेल्या काही वर्षात ते सक्रीय राजकारणापासून दूर गेले होते. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी आपली खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली. 

माझी भाजपवर नाराजी नाही तर, देवेंद्र फडणवीसांवर नाराजी आहे. असे खडसेंनी याआधीही वारंवार स्पष्ट केले आहे. आज पक्षप्रवेशावेळी बोलताना ते म्हटले की, '' मी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडेही या बाबत तक्रार केली. परंतु ते म्हटले की, नाथाभाऊ तुम्हाला भाजपमध्ये आता भवितव्य नाही. पक्ष बदलता आला तर बदलून टाका. यावर खडसेंनी विचारले की कुठे जाऊ? तर त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला.

नाथाभाऊंची ताकद महाराष्ट्राला दाखवू, शरद पवारांचं सूचक विधान

खडसेंच्या या गौप्यस्फोटामुळे दिल्लीतील भाजपच्या कोणत्या वरिष्ठ भाजपनेत्याने खडसेंना भाजप सोडण्याचा सल्ला दिला. या चर्चांना उधान आले आहे. याविषयी शरद पवार यांच्याही कानावर टाकल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे एकनाथ खडसेंना दिल्ली दरबारी सुद्धा न्याय मिळाला नसल्याचे त्याच्या बोलण्यातू स्पष्ट होत आहे.

Senior BJP leader in Delhi says, if you can change the party, change it Eknath Khadses says

--------------------------------------------------------

loading image