उल्हासनगरात सुसज्ज मिडटाऊनमुळेे जेष्ठ नागरिक सुखावले

दिनेश गोगी
सोमवार, 17 डिसेंबर 2018

उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी भलेमोठे झाड कोसळल्याने दुरावस्था झालेल्या गोलमैदान येथील उल्हासनगर पालिकेचे बंद पडलेले रोटरी मिडटाऊन पूर्वीपेक्षा अधिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून जागाच नसल्याने भटकंती करणारे जेष्ठ नागरिक सुविधांमुळे सुखावून गेले आहेत. यासाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक मनोज लासी यांना जेष्ठ नागरिकांनी शाबासकी दिली आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या रोटरी मिडटाऊनचा परिसर, सभागृह हे बसण्याचे फिरण्याचे किंबहूना विसाव्याचे ठिकाण असल्याने जेष्ठ नागरिकांचा येथे सातत्याने वावर असायचा. मात्र, सहा महिन्यांपूर्वी मिडटाऊनवर बाजूचे भलेमोठे झाड कोसळल्याने मिडटाऊनची दुर्दशा झाली होती. सभागृहाची नासधूस झाली होती. वायरी पडल्याने विद्युत पुरवठा बंद पडला होता. त्यामुळे जेष्ठ नागरिकांची अवस्था बिकट झाली होती.

नगरसेवक मनोज लासी यांनी जेष्ठ नागरिकांची अवस्था गृहीत धरून सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग,वृक्ष प्राधिकरण,मालमत्ता विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर पालिकेने 13 लाख रुपयांच्या निधीतून मिडटाऊनला नव्या रूपाची झळाळी दिली. 23 तारखेला मिडटाऊन जेष्ठ नागरिकांसाठी व विविध कार्यक्रमासाठी खुले होणार असल्याने मनोज लासी यांच्यावर शाबासकीचा वर्षाव होऊ लागला आहे.

Web Title: Senior citizens are well equipped with well-equipped midtown in Ulhasnagar